मराठी (Marathi)


ट्रिनीटी : परमेश्वराच्या जीवनात प्रवेशाचे आमंत्रण

हा मौसम कलीसियातील मोठ्या सणांचा मौसम आहे.आपण लौकरच साजरा करणार आहोत संण पवित्र ट्रिनीटीच्या उत्सवाचा.एक देव परंतु तीन मनुष्य : वडील,मुलगा नि पवित्र आत्मा.प्रत्येकजण देव आहे पण तरीही मिळून एकच देव म्हणून आहेत.  

ट्रिनीटीच्या गूढ रहस्याने अनेक इसाई संभ्रमित आहेत व त्यांनी याचे गूढ कधीही खोलात जाऊन समजून घेतले नाही जे रहस्य प्रभू येशू ने आपणास आश्वासित पवित्र आत्म्याद्वारे प्रगट केले आहे.आपल्या अशाश्वत शरीरांमध्ये आपला श्वास म्हणजे "पवित्र आत्मा " फुंकून देव अगदी प्राथमिक रीतीने आपणास त्याच्या आयुष्यात आणतो.तो आपल्या मर्त्य शरीरास जीवन देतो ज्यामुळे आपण जिवंतपणे देवाच्या आयुष्यात प्रवेश करतो. या जीवनाला तुम्ही संपवू,चिरडू वा त्यावर तुम्ही प्रभुत्व गाजू शकत नाही .बाप्तीस्म्याच्या कृपेतून आपण इसाई प्रभूमुळे जिवंत आहोत व पवित्र आत्म्यास सहकार्य करून कायाकाल्पात समृद्ध होत आहोत ,हे आपणात सहजतेने होत आहे."देव आपणात कार्यरत आहे,दोन्ही साठी त्याची इच्छा व त्याच्या खुशीसाठी."फील २:१३  

देवाची त्रयीची संकल्पना हि इसाई धर्मात अतिशय अद्वितीय आहे.देवानी आपणास स्वतःला तीन स्वरुपात दर्शवले आहे त्याला आपण सहभागी करूयात आपल्या जीवनात ज्याप्रमाणे तो त्याच्या जीवनात सहभागी आहे ;संपूर्ण साहचर्य व प्रेमानी."जे आम्ही पहिले व ऐकले ते आम्ही तुम्हासही घोषित करतो जेणेकरून तुम्ही आमच्याशी साह्चार्यात याल ,आमचे साहचर्य जे पिता व त्याचा पुत्र प्रभू येशुत आहे ."१ योहान १:३  

ज्याप्रमाणे कुटुंबात सर्व नातेसंबंध हे पितृत्वापासून सुरु होतात त्याच प्रमाणे इसाई धर्मात सर्व नातेसंबंध हे देवाच्या पितृत्वाने सुरु होतात.या अस्तित्वाच्या घडीला मनुष्याजातीचे हे पाप आहे कि ते देवाला पिता म्हणून ओळखत नाहीत.देव यास काही वेळा दुर्लक्षित करतो.परंतु आता तो सर्व मनुष्यास पश्च्यातापाची आज्ञा करतो.प्रेषितांची कृत्ये १७:३०.प्रभू येशू आपणाकडे येण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे देवास आपणास प्रगट करण्यास आणि त्यामध्ये विश्वास ठेवून आपले अंतिम परिपूर्णता साधण्यास.आपली परिपूर्णता हि देवासोबत आले असलेले नातेसंबंध यामुळे येते.चांगली कृत्ये केल्यानी नाही.चांगली कृत्ये हेच जर देवाचे परिमाण असते तर त्याने प्रेषितांच्या कृत्ये यातील १० व्या प्रकरणात कॅर्नेलेउसला त्याची चांगली कृत्ये पार पडत राहाव्याला सांगून जोप्पा मधून आलेल्या पेईत्रास शिष्य म्हणून निवडले नसते.देव हे आत्म्यासाठी असलेले अन्न आहे ज्याप्रमाणे अन्न हे आपल्या शरीरासाठी आहे.दैवी अन्न हे फार किमती आहे पृथ्वी वरील कुठल्याही कार्य व अन्नापेक्षा.हि फक्त नव्या कराराची नाही तर फार सुरवाती पासूनची शिकवण आहे.;"मनुष्य फक्त भाकारीमुळे जगू शकत नाही."देऊत ८:३  

पवित्र आत्मा जो आम्हास देवाशी या नात्यात बांधतो त्याचा परिचय आपणास प्रभू येशूने नव्या व नवशक्तीच्या रुपात करून दिला आहे. आता आपण कृपापूर्ण व देवाशी एकरूप असलेले जीवन एकमेकांबरोबर साह्चार्याने घालवण्याचा किंवा ते नाकारून आत्मकेंद्रित व स्वतःची अशी एक वस्ती वसवण्याचा अशा पैकी एकाची निवड करू शकतो .  

प्रभू येशू हा आपल्यातील एकात्मतेचा अदृश्य नेता आहे तर पोप हे कालीसियातील एकीचे जी एकी आपण पवित्र आत्म्याच्या आश्वासानानी मिळवली आहे त्याचे दृश्य नेतृत्व आहे.एकी हिच समानता असा गैरसमज केला जातो कारण मनुष्य जाती हि समानतेच्या गणवेशात आरामदायक असते.दुर्दैवानी कालासियात असेही काही जन आहेत जे या समानतेसाठी काम करतात व ज्यामुळे ते दैवी देण्ग्यांपासून वंचित राहतात व ते ज्यातील मुल अर्थ समजू घेऊ शकत नाहीत.(१ कोरीयंथ १२:४फ़्फ़) येथे सर्व प्रकारची प्रतिकारात्मक सूत्रे व तर्कसंगत कामकाज काही घमंडी अधिकार्यान खाली खूप जागी देवाच्या कालासियात समृद्ध होतात.  

यासाठी आपण त्रयीन कडून शिकवण घेतली पाहिजे .जरी सर्व देवासमान असले तरी प[रात्येकाचे कार्य हे अनुक्रमे वेगळे आहे.त्यांच्या कार्यात मत्सर व इर्श्येला कुठेही जागा नाही .  

त्रयी हि काही एक संकल्पना नसून सत्य आहे ज्याची छाप आपणास देवाच्या निर्माण केलेल्या गोष्टीत आढळते.दुसर्या शब्दात "देवानी आपल्या निर्मितीवर आपली छाप सोडली आहे." 

सर्वात पहिल्या छापेचे प्रमाण आपणास सापडते ते उत्पत्ती ग्रंथात(२६-२७)आणि देव म्हणाला "मनुष्याला आपल्या प्रतिमे प्रमाणे निर्माण करू यात.आपल्या समानते प्रमाणे व नंतर त्यास समुद्रातील माशांवर, हवेतील पक्ष्यांवर ,पशुंवर ,व सर्व रेन्गाण्यारांवर व प्रत्येक रेन्गणाऱ्या पृथ्वीवरील जीवांवर अधिपत्य असू देत."म्हणून देवानी मनुष्यास त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केले,त्याच्या प्रतिमेत त्याने मनुष्य निर्माण केला,व मनुष्य व स्त्रीस त्यांनी निर्माण केले. शास्त्राच्या या उतार्यात आपल्याला स्त्री व पुरुष निर्मितीच्या दृष्टीकोनाची माहिती होते.त्याने स्वतःप्रमाणे त्यानाही त्याच्या निर्मितीवर अधिकार दिला.(पस ८:६-८)"प्रत्येक प्रकारच्या पशु व पक्षी सरपटणारे व समुद्री जीव,हे पाळीव बनविले जाऊ शकतात आणि ते मनुष्य जातीने पाळिले आहेत."जेम्स ३:७ 

 आपण पाप न करण्याच्या आज्ञा मोडण्याच्या पवारुत्तीखेरीज हि देवानी आपल्यावर त्याची छाप सोडली आहे.(रोम ११:३२)मनुष्य हा शरीर ,मन व आत्मा अश्या त्रयीत एक आहे.आपण ज्यां ना हे सत्य माहित आहे तरी आपण मनुष्यास ३ वेगळे असे मनात नाही.जरी आपण पापी वृत्ती शरीरात,मनात वा आत्म्यात अनुभवली असली तरीही आपण त्यांना वेगवेगळे घटक मनात नाही.जरी आंपण मनुष्याच्या शरीराला मुत्र्युने ग्रासलेले बघतो तरी आपण त्यास मनुष्य पासून वेल्गले असे समजत नाही.काही लोकांनी स्वतःला दोन किंवा तीन घटकांमध्ये विभागण्याचा प्रयत्न केला आहे.उदा .माझे खरे आत्म .जर खरे आत्म असे काही असेल तर खोटे आत्म कुठे आहे. 

भले आत्मा काही व्यक्त करतोय किंवा शरीर वा मन वेगवेगळ्या प्रकारे तरी त्यांच्यात प्रत्येकवेळी प्रचंड सुसंगती असते.मनाच्या वा आत्म्याच्या प्रत्येक व्यक्त होणार्या भावनेत मुग ती कुठल्याही कलेच्या वा लिखाणाच्या स्वरुपात असू देत आपण मनुष्याची ओळख समजू शकतो .जेव्हा आपण व्यक्तीची व्याख्या ठोस पाने करतो तेव्हा त्याचे शरीर हे जागतिक ओळखीचे प्रतिनिधी बनते कारण आपण त्याला डोळ्यानेच बघून 
ओळखतो. 

 आपल्या शरीराप्रमाणेच प्रभू येशू हा दृश्य वा ठोस अभिव्यक्ती आहे ."तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे."(कल १:१५ अ) अमर शब्द हा नेहमी पित्य बरोबर अस्तित्वात असतो."शब्द हा शरीर झाला व आपल्यात वसला ."योहान १:१४ 

 त्रयीची छाप जी आपणास सापडते ती त्या सर्वात मोठी वस्तू वर जी मनुष्यास दिसते व जी पृथ्वी वरील जीवनास मदत करते ती म्हणजे ,सूर्य . 

 १९ व्या शतकातील साधी कर्तर सिंघ एक शीख जो यहुदी बनला होता त्याच्या मनात परमेश्वराच्या या त्रयी बद्दल तुफान माजले होते.हि शंका त्याने प्रार्थनेत प्रभू येशू समोर मांडली असता त्याचा उलगडा प्रभू येशूने त्यांस सूर्याचा दाखला देऊन प्रगट केला.एक असूनही या महाकाय वस्तूस ३ स्तर आहेत-आकाशात अस्तित्व असलेला आकार,त्यातून उगम पावणारा प्रकाश व उर्जा जी पृथ्वीवरील जीवनास मदत करते.जरी आपण सूर्याला उर्जा व प्रकाशाच्या स्तरावर जणू शकलो तरी तो एकाच आहे. 

 याचप्रमाणे देव जो स्वर्गात आपला पिता म्हणून आहे तो स्वतःला प्रभू येशुमध्ये प्रकाशाच्या स्वरुपात प्रगट करतो व त्याच्या निवडलेल्या लोकांस पवित्र आत्म्याद्वारे उर्जा प्रदान करतो. 

आपण जर अणूच्यागूढ रहस्याचा उलथ पालथ करून शोध घेतला तर त्यात प्रोटोन ,नुत्रोनव इलेक्ट्रोन आढळतात व अजून त्यांचे निरीक्षण केल्यास प्रोटोन जे धन भरीन कण आहेत त्यांना क़ुअर्क,ग्लून व चुंबकीय क्षेत्र एकमेकांस जोडून ठेवते. 

 चुंबक जे जगात उर्जेचा मोठा स्त्रोत आहे व ज्याच्या वापरणी आजच्या जगात प्रचंड प्रमाणात परिवर्तन होऊन वीज उत्पादन होते ,हे सुधा त्रयीचा एक नमुना आहे.उत्तर ध्रुव ,दक्षिण ध्रुव,व चुंबकीय उर्जा हि नालाकर चुम्बाकाद्वारे देवाच्या त्रयीच्या स्वरुपाची सूचना देतो . 

 यात काही आश्चर्यजनक नाही कि शिष्य पेईत्र जो या आधुनिक जगापासून अनभिज्ञ होता तरी तो सांगतो कि देवानी स्वतःला निर्मिती मध्ये प्रगट केले आहे."जगाच्या उत्पती पासून देवाचे अदृश्य स्वरूप त्याच्या चिरकालीन शक्ती व देवत्व हे आपन्न त्यांनी निर्माण केलेल्या गोष्टीत आढळते."रोमन १:२०.म्हणून कोणीही मला देव माहित नाही असे कारण देऊ शकत नाही."म्हणून कुठल्याही कारणांनी त्यांनी देवास देव मानून गौरव देण्यास व त्याचे आभार मानले नाही.व ते त्यांच्या निरर्थक व अनर्थक विचारांनी अंधःकारात ढकलले गेले .स्वतःस शाने म्हणवून घेऊन ते मूर्ख बनले व देवाचा गौरव त्यांनी प्रतिमा जी मनुष्यांच,पक्ष्यांची,पशूंची,तसेच सर्पातानार्यांची होती त्यांना दिला ."रोम १:२०-२३ 

 कोणालाही देव माहित नाही या कारणासाठी क्षमा नाही तसेच इसाई सुधा देवाची त्रयी व त्याचे गूढ रहस्य जाणण्याच्या इच्छेला न ओळखण्याचे कारण देऊन क्षमा मिळू शकत नाही.प्रभू येशुनी आपणास त्याचा पवित्र आत्मा दिला जो आपणा सोबत असेल व आपणास सर्व सत्याचा मार्ग दाखवेल (योहान १६- १३ )

प्रार्थना - देवा मला तुझा पवित्र आत्मा सर्व सत्यतेत मार्गदर्शन करू देत व मला तुझ्या बोलावण्यात प्रामाणिक राहू देत.मला त्रयीच्या गुढतेमध्ये वास करण्यास मदत कर व तुझ्या संपन्न आशीर्वादानी आयुष्य जगण्यास अनुग्रह व शक्ती दे 


-फा. कॉनरेड सल्धाना
मुंबई ,इंडिया 
भाषांतर: Dr. Trupti Ghorpade








देवाचे आश्वासक वरदान

खूप वर्षान पूर्वी जेव्हा माझी पुरोहित म्हणून नियुक्ती झाली होती तेव्हा माझ्या बहिणीने विना सीम कार्डाचा एक सेल फोन भेट म्हणून दिला पण तीला माझ्याशी त्यावर संपर्कच करता आला नाही कारण मी त्या सेल फोनचा कधी वापराच केला नाही. दोन वर्षान नंतर जेव्हा मी माझी शिबीर सेवा मुंबईचा अर्च्दिओकेसेमध्ये सुरु केली तेव्हा माझा सहकार्यांनी मी कधीही काही तत्काळ निर्णय घेताना उपलब्ध नसण्याची तक्रार बरेच वेळा केली. तेव्हा सेल फोन हा संपर्काचा व त्वरित उपलब्धतेचा मार्ग बनला. आता ते माझाशी केव्हाही व कधीही संपर्क करू शकतात.
ह्याचप्रमाणे बाप्तीस्म्यामध्ये मध्ये देवानी आपल्याल्या पवित्र आत्मा दिला आहे; ज्यामुळे देवाची आपणात उपस्थिती आहे, पवित्र आत्म्यात देवाचा वास आहे( ईफेसिंस, २:२२). पवित्र आत्म्यामुळे आपण देवाच्या सोबत राहू शकतो व देव आपल्या सोबत, इम्मनुएल ( देव आपल्यासोबत आहे.).पवित्र आत्म्याद्वारे आपण देवाच्या पवित्र सिंहासना पर्यंत पोचू शकतो व देवानी आपल्यावर केलेली कृपा व आशीर्वाद मिळवू शकतो ( ईफेसिंस३:१२, हिब्रू४:१६), ज्यामध्ये संतांची सहचार्याची महिमाही असते. (ईफेसिंस१:१८) आपण पवित्र आत्म्यात योग्य व्यक्तीशी सवांद साधतो, देवाशी. जो आत्म्यात वसतो रोमन८:१५, गळ. ४:१६) आणि देव त्याचे ज्ञान व प्रेम आपल्या पर्यंत त्याच्यातून पोहचवतो (रोमन ५:५५). शास्त्रांमध्ये योहानच्या प्रकरणातील एक वाक्य जे माझ्यावर छाप टाकते व जे माझे अंतःकरण हेलावून टाकते ते म्हणजे, "जर तुला देवाच्या वरदनान विषयी माहिती आहे व तुला माहित आहे ती तो तुला कोण सांगत आहे, "मला पाणी द्या जर तुम्ही त्याला सांगितले तर तो तुम्हाला जीवनाचे पाणी देइल" (योहान ४:१०) आपल्या जीवनाचा अर्थ शोधणे ही मानवतेची मोठी तहान आहे, जी त्याला किंवा तिला संपूर्णपणे तृप्त करते.
ह्या उताऱ्यातील सुंदरता म्हणजे त्याच्या आर्त मागणीतील उत्कटता . ही उत्कटता आपल्याला त्याचा इतरांच्या गरजांसाठी असलेला कळवळा दर्शवते. या वाक्यात आपल्याला मनुष्याची दुर्बलता दिसते, जी सर्व जाणूनही जगण्यासाठी आवश्यक व महत्वाच्या असणाऱ्या दृष्टीकोनाच्या गोष्टींकडे मूर्खपणे दुर्लक्षित करते. त्याप्रमाणे प्रभू येशू त्या स्त्री शी बोलतांना सर्व मनुष्य जातीला संबोधित करतो, "जर तुम्हाला देवाच्या वरदानाची माहिती आहे,जर तुम्हास ठाऊक आहे कि कोण आहे जो हे सांगत आहे... ".
खरोखर आपल्याल्या त्या वरदानाची माहिती असूनही आपला प्रतिसादही त्या स्त्रीप्रमाणेच आहे जिला त्यातील मुद्दा गवसलाच नाही. इथे आपण मनुष्याच्या दुर्बलतेचा आणखी एक पैलू पाहतो ज्यामुळे मनुष्याला त्याच्या पापाबाहेर जाऊन काय सांगितले जाते ते तो वेगळ्याच दृष्टीने समजतो. देव मनुष्याच्या पापी वृत्ती व उशिरा आकलनाच्या बद्दल अतिशय धीरानी काम घेतो व म्हणूनच
प्रभू येशूने ह्या संवादाला अतिशय असाधारण स्तरावर न्हेले. ज्यामुळे ती स्त्री त्याला धर्मोपदेशक समजली. प्रभू येशू हे खरोखरच अतभूत आहेत जे जरी आपल्याला पूर्णपणे कळले नाही तरी विश्वास पात्र आहेत. प्रभू येशूने स्वतःच्या तार्किक गोष्टींचा मार्ग बदलून निराळ्या संकेताचा दाखला अवलंबला. हे प्रभू येशूने जाणीवपूर्वक केले कारण ते जाणून होते की जरी अतिशय तर्कशुद्ध व अधभूत असे देवाचे ज्ञान असले तरीही ते तसेच्या तसे पापी लोकांकडे पोहाचवल्यास फायदा होत नाही. ती स्त्री त्यास धर्मौपदेशक समजल्यानि अर्धा त्रास कमी झाला. यामूळे प्रभू येशूला न समजताही ती एका
विश्वासाच्या पातळीवर पोहोचली. अगदी हेच शिष्यापैत्राने केले ज्यावेळी तो गोंधळलेला व शुद्धीत नव्हता - "देवा, मी कोणाकडे जाऊ? तुझा कडे अनंत जीवनाचा शब्द आहे (योहान ६:६८). कुठल्याही विज्ञान , तर्क, मनुष्याची बुद्धिमत्ता, देव माणसे व बाबांपेक्षा तू सुरक्षित आहेस. तू विश्वासपात्र आहेस." (तुलना करून उत्पत्ती ग्रंथ ३सरे प्रकरण - एदेनच्या बगीच्यात सर्वात पहिल्या मोहाच्या क्षणी सर्पाचा वाद हा अतिशय तर्कशुद्ध होता व स्त्रीने त्यामुळे भुलून जाऊन आपल्या सेवेने प्रिय पतीचे मन वळवले , त्यास व त्याच्या द्वारे संपूर्ण मनुष्य जातीस जिंकले. परतू ह्या व्यर्थ सेवेने पूर्ण मनुष्यजातीस नाशास पोचवले.)
अन्न,पाणी, वस्त्र, निवारा, ह्या मुलभूत गरजा सोडून आता आपण मनुष्याच्या इतर तहानेकडे पाहूया, ती संपत्ती, सत्ता, लोकांनी आपणास स्वीकारण्याची,आत्मगौरव, अभिमान, वाईट सवई आणि बंधने यांचीही असू शकते. फार क्वचित एखादा जे त्याच्यापाशी आहे त्यात संतुष्ट असतो, व नेहमी आहे त्यापेक्षा जास्त मिळवण्याचा शोध घेतो. ज्या प्रमाणे तहन्लेल्यास आपण तहान भागवण्यास पाण्यासोबत एखादे शीतपेय व बियर दिले असता तो ते ही पिवून टाकतो,जरी त्याची मुलभूत तहान ती पाण्यानी भागली गेली असतांनाही, त्याची आंतरिक तहान जीवनातील सुखासाठी कधीच मरत नाही. ह्या व्यतिरिक्त आणखीन एक तहान आहे ती इतरांचे चांगले करण्याची, दुर्देवि लोकांपर्यंत पोहोचण्याची, देवास सोडून इतरांना प्रेम देण्याची व दर्शवण्याची. हे एक स्वयं केंद्रित लक्ष्य आहे
ज्याला साध्य करताना त्याची निष्पत्ती आत्मागौरावातच होते. तहान असणे ही समस्या नाही पण ती कश्यातर्हेने भागवली जाते, कुठल्या उद्देश्याने व कुठ्पर्यंत भागवली जाते ही समस्या आहे. मनुष्यास तहान असणे हे नैसर्गिक व योग्य आहे. ती कुठे व कशी वळवली जाते ह्यावरच ती चांगली की वाईट ठरते.आपली तहान आपण कशानी भागवत आहात? ही मनुष्य जाती जेव्हा स्वतःहाच गोंधळलेली आहे, त्यांना त्यांचे भाग्य आणि जीवनाचा अर्थ कुठे शोधायचा हेच माहित नाही असे असल्यावर ती आपली तहान कुठे वळवू शकतील ? जे वर वर आहे तेच मुलभूत सत्य आहे असा त्यांचा गैरसमज आहे. प्रभू येशू आपणास जीवनाचा परम अर्थ व आपल्या जीवनास दिशा देतात. येशूने आपणांस दाखवले त्याच्या पुनरुथानातून ,प्रत्येक मनुष्याचे परमेश्वरच्या नजरेत असलेल्या महत्वात हरएक मनुष्याची परम तहान दर्शिवली आहे ,ज्याची प्रत्येक जनांस थोडी किंवा अधिक प्रमाणात लालसा असते. माझा जीवनाचा परम अर्थ काय आहे, या जीवन प्रवासात कोण आहे, माझे अस्तित्व का आहे ह्या प्रत्येक प्रश्नाचे जर प्रभूयेशू आपणांस शास्त्राचा या उताऱ्यात देतात.
१.''जे पाणी मी त्याला देइन ते त्यामध्ये अनंत जीवनाचा झरा बनून राहील''(योहान ४:१४). हे पाणी आपली अनंत तहान भागवेल व आपणांस पाप व मृत्युच्या नकारात्मक ओढाताणीतून बाहेर येण्यास मदत करेल.
२.''खरे भक्त देवाला जे तो शोधत आहे त्याप्रमाणे आत्म्यात व सत्यतेत पुजतील'' (योहान ४:२३). हे जीवनाचे पाणी आपला देवाशी वैयक्तिक व खरा पद्धतीने संबंध जोडेल. जर आपणासोबत देव असेल तर आपणांस आपली तहान शमव ण्यास आणखी कशाची गरज आहे? एकट्या देवा मधेच आपली खरी व पूर्ण पूर्तता आहे . पवित्र आत्मा हे देवाचे वरदान आहे जे मनुष्याची परम व मोठी तहान भागवते;तहान परमतेची, तहान एका अंतिम सत्याची, जे त्याची जीवनाचा अर्थ व सुख मिळवण्यास मदत करते. फक्त प्रभू येशू त्यास आपणांस देतो. शास्त्र आपणांस शिकवते की देव आपले जीवन, म्हणजेच पवित्र आत्मा उदारपणे पवित्र वेदीवर मनुष्य जातीवर ओततो. "जर तू ते मागशील तर तो तुला जीवनाचे पाणी देइल"(योहान ४:१०). मागितल्याशिवाय पवित्र आत्मा मिळणार नाही
.
प्रभू येशू आपल्याला पवित्र आत्मा जो परमेश्वराचे वचन आहे त्याबद्दल माहिती देतो. जरप्रभू येशुस त्याची माहिती नसती तर तो आपणांस त्याबद्दल सांगू शकला नसता.सर्वप्रथम आपणांस पवित्रआत्मा व त्याच्या शक्तीला जी तो आपल्या जीवनात लागू करण्याची तसेच त्याला स्वीकारून आपल्या जीवनात कार्य करू देण्याची गरज आहे तिला जाणून घेतल्यासच आपणांस देवाचे वरदान मिळू शकते. पवित्र आत्म्याचे स्वागत करून त्यास जाणून घ्या व तो तुम्हास सही जाणून घेइल.
प्रभू येशूने आपणांस पवित्र आत्म्यास आपल्यास कधीच प्रगट केले नसते तर त्याने आत्म्यास ओळखले व प्राप्त केले नसते.
पवित्र आत्म्यास न जाणून घेतल्याने आपण काय गमवतो ?
१. सातत्याचे शिक्षण व निर्मिती ( योहान १६:१२-१३) - आपला विकास प्रभू येशू मधेय प्रगट केल्याप्रमाणे देवाच्या प्रतीमेत व त्यातील समानतेत असणे हेच विकासाचे परिमाण व अट आहे.( योहान १४:२६, लुक १२:१२) सूचना विकासाच्या,सूचना स्वसौराक्षानाच्या , सूचना ज्यात तुम्ही अपराधी ठरू शकता,पापाच्या, धर्माच्या, व न्यायाच्या (योहान १६:८)
२. देवाबारोबरील नातसंबंध- पवित्र आत्मा आपणांस देवाशी नाते प्रस्थापित करण्यात मदत करतो. हे नाते आपणांस काळ्या व दुष्ट ताकदि ज्या आपल्याला देवापासून व त्याच्या ज्ञानापासून दूर नेण्यास पाहतात ,त्यांचा सामना करायला मदत करते. (योहान ४:१४-१७) आपणांस अनंतापर्यंत वाचवण्याचा ते नाते एक मोहर व खात्री आहे.
३. दिलासात्माकता ( २ कोरीयंथ १:४, ७:६)- पवित्र आत्मा आपणांस या विश्वासघातकि व कठीण अशा आपल्या जीवनाच्या मार्गावर दिलासा देतो. ज्याची किंमत देवाचा पुत्राने याच मार्गावर अत्यंत वेदनामय पद्धतीत, अपमान व शरमेच्या वधस्थम्भावर शारीरिक व मानसिक अत्याचारात दिली. याच प्रमाणेआपणही आपणांस काही निरर्थक सत्ताधीश माणसांमुळे यातनेचे शिकार झालेले पाहतो. अशा निर्वाणीच्या परिस्थितीत पवित्र आत्मा आपणांस योग्य गोष्ट मांडण्यास बुद्धी व मार्गदर्शन तसेच दिलासा देतो ( लुक १२:१२).
४.वरदनानांनी सशक्तीकरण - मनुष्य जातीला स्वतःच्या आत्म्याचे व जीवनातील परम भाग्याचे महत्व प्रकाशित करण्यासाठी जे प्रभू येशूचे कार्य आहे त्याच्या पूर्णत्वासाठी आपणांस पवित्र आत्मा दिला आहे (योहान १५: २६). प्रभू येशूने आपल्यात हे प्रकाशित करण्याची किंमत मोजली आहे. पवित्र आत्मा आपल्यास देवाची लेकरे बनवतो. देवाची उपस्थिती या मानवी जगात असणे हे सर्वात उच्च असे चिन्ह आहे. तो कलस्यास निरनिराळी वरदाने देऊन सशक्त करतो, हे कलसिया बांधण्याचे काम पूर्ण करण्यासाठी, त्याने जिला रक्ताची किंमत देऊन सोडवले आहे.
५. चरित्र निर्माण व शक्ती- आपल्याला देवाप्रमाणे बनवण्यास देवास खर्या अर्थाने आत्म्यामध्ये पूजणे हीच सर्वात सोपी व सुलभ पद्धत आहे. जर कुसंगती चांगल्या तत्वांचा नाश करते ( १ कोरीनथीयन १५:३३) त्याच प्रमाणे खर्या अर्थाने देवाला पुज्ल्याने व त्याच्या संगतीने आपल्या व्यक्तिमत्वाची वृद्धी होते. ही तहान आपणांस भौतिक सुखांच्या सोधापासून सुरक्षित करते.आपणांस परमेश्वर व शेजार्यांची सेवा करण्याचे माध्यम बनवले आहे; त्याकरता पवित्र आत्मा आपणांस प्रार्थना कशी करावी ते शिकवतो.
६.साहचर्य व प्रेम - पवित्र आत्म्याचे सर्वात महत्वाचे फळ म्हणजे एकी व साहचर्य. ते तो आपल्यात जागृत करतो (प्रे.कृत्ये २:४४-४५) तो ते करतो. हे सर्व घटक या जगाला सामोरे जाण्यासाठी व त्यास परिवर्तीत करण्यासाठी कलसियाला जिवंत ठेवतात. पवित्र आत्म्याच्या या कार्याला अस्वीकार करणे हा कलसियातील सर्वात गंभीर अपराध आहे. हे म्हणजे पवित्र आत्म्या विरुद्ध पाप करणे आहे, घोर पाप. ( मति. १२:३२, मेर्कुस ३: २९, लुक १२:१०)

प्रार्थना- हे स्वर्गीय पित्या, मला नेहमी तुझ्या मौल्यवान वर्दानांची प्रामुख्याने पवित्र आत्म्याच्या कृपा वरदानाची किंमत असु देत. मला त्याच्या शक्तींनी भरून टाक. मला तुझे माध्यम बनव व मी जे सर्व काही करतो त्यात तुझ्या पवित्र आत्म्याच्या उपदेशांप्रती सजग ठेव. 

-फा. कॉनरेड सल्धाना
मुंबई ,इंडिया 











                                              प्रस्तावना
इस्टरच्या महिन्यात लवकरच आपण स्वागत करणार आहोत, एका अतिशय महत्वाच्या सणाचे तो  म्हणजे पेन्तेकॉस्त. ह्या सणाचे महत्व म्हणजे आपल्याला ह्या दिवशी पवित्र आत्म्यापासून वरदान मिळते. ह्या दिवशी प्रभू येशूचे शिष्यगण वेग वेगळ्या भाषा बोलू लागले व  तरीही आपल्या कार्यासाठी त्यांनी  एकजूट होऊन पूर्वी कधीही केले  नाही अश्या पद्धतीत कार्य केले.


भाषा लोकांना एकत्र आणते. अश्याच प्रकारे एक जमात जी समान भाषा बोलते ती एक होऊन, जगात विविध देशांची आणि त्यांची स्वतःची अशी असलेल्या भाषांची निर्मिती झाली.


एकदा एक मराठी स्त्री आपली परदेशी यात्रा संपवून परत येत असताना, एका युरोपेअन स्त्री ला भेटली आणि तेव्हा तिला जाणवले कि त्या परदेशी युरोपेअन स्त्रीला मराठी भाषा चांगली अवगत आहे. अशा तह्रेने भाषेमुळे  त्यांच्या घनिष्ठ मैत्रीची सुरुवात झाली आणि अजूनही त्या संपर्कात आहेत. 
भाषा ही एक मेकांना जोडणारा महत्वाचा  दुवा आहे. हा दुवा नेहमीच सकारात्मक असतो असे नाही. जे कोणाला  एकत्र आणू शकते ते एकमेकात फूट ही घालू शकते. 


मनुष्याचा स्वभाव हा स्वार्थी असल्याने त्या स्वार्थी हेतूनुसार केलेली एकता ही नुसतीच हानिकारक नसून ती एकमेकांना परकी बनवते. जुन्या करारातील उत्पत्तीच्या अकराव्या प्रकरणात आपल्याला सांगितलं की संपूर्ण जगाची भाषा ही एक आहे. ईश्वराला  त्यांच्या  स्वार्थी एकजुटीचे कारण आणि हेतू लक्षात आल्यावर तो म्हणाला " जे त्यांना साध्य करायचे आहे ते आत्ता साध्य करणे अशक्य आहे". उत्पत्ती ग्रंथ (११:६), त्यामुले देवाने लोकांना वेग वेगळ्या भाषा  देऊन गोधळवले आणी पृथ्वी वर विखरून टाकले. 


एकात्मता हा अतीशय संवेदनशील घटक आहे. निरनिराळ्या समूहात एकत्रीकरणासाठी सामुहिक दबाव असतात. बहुतांशी लोक एखाद्या करणासाठी भीतीपोटी एकत्र येतात किवा बहूमताकडे झुकतात. ( बहुमत हे नेहमी सत्य नसते. कधी कधी भीती व परिस्थिती बद्दल निर्विकारपना हे सुद्धा एकजुटीचे कारण असू शकते). 


स्टालिनचा काळातील असलेला रशिया त्याचा लोकांवरील असलेल्या मजबूत पोलादी पकडी मुळे आजच्या रशिया पेक्षा जास्त एकसंघ होता. ही एकजूट सत्य आणि स्वातंत्र्यच्या पायावर उभी कधीच नाह्वती. एका माणसाच्या हेतूमुळे बरेच लोक अशा दुष्ट व हिंसक प्रवृत्तीला बळी पडले. प्रभू येशूला वधस्थाम्भाला खिलवणे  हे सुद्धा अशाच प्रकारचे फळ होते, जे फूट पण दर्शवते. ते एक सुरात ओरडले, " अम्म्हास बराब्बास द्या". पुन्हा ते एक आवाजात किंचाळले, "ह्याला वधस्थाम्भाला खिळ्वा, ह्याला वधस्थाम्भाला खिळ्वा". एक भयानक दरी देव व मनुष्यातील (?)


 खरे आहे आपल्या निजी हेतुंवर अवलंबून असलेली आपली एकजूट देवाच्या आपल्या साठी आखलेल्या शाश्वत व प्रेमळ योजनेच्या मार्गात अडथळा होऊ शकते. 


ह्या वरून हे असे दिसते की मनुष्यांनी देवा व्यतिरिक्त कुठल्या ही कारणानिमित्त  एकजुटीचा विचार करू नये. जुन्या करारा प्रमाणे आपण पाहतो की देव हा विभाजन करणारा आहे, पण नवीन करारा अनुसार तो एकात्मतेचा शोध घेतो. ही कुठल्याही किमती वर एकात्मता नाही. एकात्मते च्या मागे असणे हे सर्वोच्च ध्येय नव्हे. म्हणूनच नव्या करारात येशू मनुष्यांसाठी देवाचा कृपाळू व प्रेमळ योजनेचा खुलासा करतो. प्रभू येशू आपल्याला एकजुटीसाठी एक उद्देश्य देतो. तो स्वताच एक उद्देश्य आहे व ते साध्य करण्यासाठी तो आपल्यावर त्याच्या दृष्टीने पवित्र आत्म्याच्या कृपेचा वर्षाव करून आपणांस शक्ती प्रदान करतो. देव ती एकजूट तडीस नेतो, आपणांस महत्वाचे आहे की आपण देवाचा हेतू व संदेश आपल्या हृदयात जोपासावा. 
प्रभू येशू च्या शिष्यांनी हे केले , आणी जो पर्यंत त्यांनी ते केले, त्यांनी जागतिक जमातीत एकता व प्रेमाचा संदेश प्रसारित केला जो प्रभू येशू करू इच्छित होता. 


कित्तेक वेळा आपण चर्चच्या कामात सक्रीय असूनही आपली प्राथमिक उद्दिष्ट भरकटलेली असतात.आपली एकात्मता बरेच वेळा ही भौतिक सुखांवर आधारित असते. अशा प्रकाराच्या सैल एकजुटीतून आपण यशस्वी सुद्धा होऊ शकतो परंतु येशूचा शाश्वत हेतू जो आम्हाला त्या मध्ये एकजूट होण्यास सांगतो त्या कार्यात मात्र आपण अ-यशस्वी होतो. म्हणून गरजेचे आहे प्रभू येशूला धरून राहणे, ज्यामुळे आपणांस फूट पडण्याऱ्या शक्तीनपासून मुक्ती मिळवून यात बळी पडलेली लोकांची आपण एकजूट करू शकतो.


योहानच्या पंधराव्या प्रकरणात आपणांस येशू मध्ये एक होण्यास व त्याच्याशी जुडन्यास आमंत्रित केले आहे, आपल्या इतर बंधू आणी भगिनीन सोबत. त्याच्या व्यतिरिक्त आपण काही ही करू शकत नाही.
 
(योहान १५:५) मनुष्य जातीला त्याचा शिवाय एकजूट करण्याचा प्रयत्न सुद्धा निरर्थक आहे. व ती एकता नाम मात्र असून खोट्या शांतीचा अनुभव देइल.

विविध भाषांची गरज व नवी एकात्मता यांच्या ह्या प्रास्ताविकानंतर प्रभू येशू मध्ये एक होऊन आम्ही ह्या नवीन मराठी ब्लोगचा शुभारंभ करीत आहोत. वेग वेगळ्या भाषा बोलूनही ज्या प्रमाणे प्रभू येशू चे शिष्य त्याच्या कार्या साठी एकजूट होते त्या प्रमाणे आपली मने व हृदये हे एकजूट असून पेन्तेकॉस्तच्या स्वागत करण्यासाठी सज्ज असतांना हा नवीन भाषेतील ब्लोगचा हा शुभारंभ अर्थपूर्ण ठरेल.  


डॉ. तृप्ती घोरपडे ह्यांचे मी खास आभार मानू इच्छितो ज्यांनी स्वेच्छेने ही सदरे दर आठवड्यात मराठी भाषिकांना त्यांचा लाभ करून देण्यासाठी भाषांतरित करायचे ठरवेले आहे. मराठी भाषिकांत पर्यंत पोहोच्याची ही एक नवीन व छोटीशी प्रयत्नांची सुरुवात आहे. देवाच्या ह्या कार्याला संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याच्या प्रयत्नांना तुमच्या सहकार्याची, प्रार्थनांची , व सक्रीय मदतीची गरज आहे. 

देव तुम्हास आशीर्वादित करो, व प्रभू येशू मध्ये एकजुटीची ठेवो, ज्या प्रमाणे त्याच्यामध्ये  प्रत्येक भाषा व जमाती एकत्र आहेत . 

-फा. कॉनरेड सल्धाना
मुंबई ,इंडिया